गरिब आणि गरजूंना पोट भरण्यासाठी अन्ना मिळावे या दृष्टीने गुडगावमधील एका सोसायटीने फ्रिज ठेवला आहे. सेक्टर 54 मध्ये असणाऱया सनसिटी मधील रहिवाशांनी हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. रहिवाशांनी सोसायटीच्या गेटवर एक फ्रिज ठेवला असून, सोसयाटीमधी किंवा बाहेरील कोणाला उरलेले अन्ना ठेवायचे असेल तर ते या फ्रिजमध्ये ठेवू शकतात ज्या गोरगरिब किंवा गरजूंना भूक आहे. मात्र खिशात दमडी नाही ते कोणालाही न विचारता फ्रिजमधील हे अन्न घेऊ शकतात.रात्री जेवणा नंतर उरलेले अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकले जाते. यामुळे हे अन्ना कोणाच्याच वाटय़ाला न येता कचऱयात जमा होते. यामुळे एखाद्या भुकेल्याच्या तोंडा पर्यंतही ते पोहोचत नाही. मात्र सनसिटी सोसयाटीने आता हे अन्न गरिब आणि भूकेलेल्यांपर्यंत पोहोचवण्या साठी हे पाऊल उचलले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews